युद्धाच्या सावटाखालीही राज्याचा इंधन पुरवठा 'ओक्के'; मनमाडच्या पानेवाडीतून १ हजार टँकर्सची रोज धाव!
मनमाड, 04 मार्च (हिं.स.)। : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मनमाड जवळील पानेवाडी येथी
Even under the shadow


मनमाड, 04 मार्च (हिं.स.)।

: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मनमाड जवळील पानेवाडी येथील प्रमुख इंधन प्रकल्पांमधून राज्याचा इंधन पुरवठा सध्या पूर्णपणे सुरळीत सुरू असून, इंधन टंचाईचे कोणतेही सावट नसल्याचे चित्र आहे.मराठवाडा भागात अफवा पसरली यामुळे येथे नागरीकांनी इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपवर गर्दी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असेंकी सध्या आखाती देशात युध्द सुरू आहे यामुळे क्रूड ऑइल अर्थात कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम होईल व यामुळे इंधनाचा तुटवडा होईल अशी अफवा सोशल मीडियावर पसरली जात आहे यामुळे नागरिक हे पेट्रोल पंपावर गर्दी करत असुन विशेषतः मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे मात्र मनमाड शहरालगत असलेल्या इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या तिन्ही मोठ्या कंपन्यांच्या प्रकल्पांतून दररोज सरासरी १ हजारपेक्षा जास्त टँकर्स राज्याच्या विविध भागात रवाना होत आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी, सध्या तरी या प्रकल्पांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.विशेष म्हणजे पुरवठा साखळी मजबूत असुन पानेवाडी हे उत्तर महाराष्ट्रातील इंधन वितरणाचे मुख्य केंद्र आहे.तर आशिया खंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे प्रकल्प आहेत येथून मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. ट्रान्सपोर्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांकडून मिळणारा साठा पुरेसा असून टँकर्सचे लोडिंग आणि वितरण वेळेवर होत आहे. युद्धाच्या चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष जमिनीवर इंधनाचा तुटवडा नाही, पुरवठा साखळी सुरळीत आहे, असे मत वाहतूकदारांनी व्यक्त केले आहे.

चौकट

नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाहीसध्याच्या परिस्थितीत साठेबाजी किंवा इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रकल्पातील कामकाज पाहता आगामी काळातही इंधनाची कमतरता भासणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.मुळात मराठवाडा भागातील काही जिल्ह्यात अफवा पसरली आहे त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे नागरीकांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही सरकार व्यवस्थित इंधन पुरवठा करत आहे.

मुकेश ललवाणी, ट्रान्सपोर्टर

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande