अंबड एमआयडीसीतून हायवा ट्रकची चोरी
नाशिक, 04 मार्च (हिं.स.)। - शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, एक हायवा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंदी अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वाहनचोरीचा पहिला प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी गोपाल संजय पाटील (रा. वडगाव लांभे (ता.
अंबड एमआयडीसीतून हायवा ट्रकची चोरी


नाशिक, 04 मार्च (हिं.स.)।

- शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, एक हायवा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंदी अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वाहनचोरीचा पहिला प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी गोपाल संजय पाटील (रा. वडगाव लांभे (ता. चाळीसगाव) यांनी एमएच ५१ सी २७१० या क्रमांकाचा सुमेत राजेंद्र कडाळे यांच्या नावावर असलेला दोन लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक मुंबई-आग्रा रोडवरील गरवारे रॅम्पच्या अलीकडच्या रस्त्याच्या कडेला उभा केला होता. हा ट्रक अज्ञात चोरट्याने सकाळच्या सुमारास चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार साळवे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande