महाडमध्ये जमिनीच्या वादातून चुलत भावावर कोयत्याने हल्ला
रायगड, 08 मार्च (हिं.स.) । महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका चुलत भावावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार जुना जमिनीचा वाद असल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी सायंकाळी सुमा
Old land dispute flares up; Attempted fatal attack on cousin


रायगड, 08 मार्च (हिं.स.) । महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका चुलत भावावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार जुना जमिनीचा वाद असल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या राहत्या घरासमोरील रस्त्यावरून गुरांचा वाडा बांधण्यासाठी बांबू व लाकडे घेऊन जात असताना ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी नात्याने चुलत भाऊ असून त्यांच्यात जमिनीच्या मुद्द्यावरून पूर्वीपासूनच वाद सुरू होता.

आरोपीने जुन्या वादाचा राग धरून फिर्यादीस शिवीगाळ केली व त्याच्यावर हाताबुक्यांनी मारहाण सुरू केली. पुढे आरोपीने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी देखील दिली.

या घटनेप्रकरणी महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande