
बीड, 16 एप्रिल, (हिं.स.)। घरमालक न्यायालयीन कोठडीत असताना चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत ७ तोळे सोन्याची चेन आणि महागड्या ब्रँडेड वस्तू चोरून नेल्याची घटना बीडमधील अंकुशनगर भागात समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गुन्ह्याप्रकरणी २४ फेब्रुवारीपासून बीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोठडीत होते. जामीन मिळाल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते आपल्या घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. यांनी घरात जाऊन पाहिले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी हॉलमधील सोफ्याचा ड्रॉवर उघडून पाहिले असता, त्यात ठेवलेले सुमारे ७तोळे सोन्याचे लॉकेटसह चेन, एक आयफोन, महागडा ब्रेडेड गॉगल आणि 'टायटन' व 'लॉन्जिनेस' कंपनीची दोन मनगटी घड्याळे असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis