
त्रंबकेश्वर , 08 मार्च (हिं.स.)।
: नागपूर येथून नाशिकरोड येथे विवाहसोहळ्यासाठी आलेले भाविक देवदर्शन घ्यावे म्हणून त्र्यंबकेश्वरला आले. मात्र, दर्शन आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसले असता पर्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या पर्समध्ये ६ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड होती.
याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तब्बल एक महिन्याने फिर्याद दाखल झाली आहे. नागपूर येथील प्रवीण नानोटी (५०) हे पत्नी आणि मुलांसह नाशिक येथे विवाहसोहळ्यासाठी आले होते. ८ फेब्रुवारीला नागपूर येथे माघारी जाण्यापूर्वी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने सकाळी ८ ला त्र्यंबकेश्वर येथे आले होते. देवदर्शन आटोपल्यावर दुपारी तीनच्या सुमारास बसमध्ये बसले असता त्यांच्या पत्नीच्या जवळ असलेल्या बॅगची चेन उघडी असल्याचे लक्षात आले. सर्वांनी बसच्या खाली उतरत बॅग तपासून पाहिली असता तिच्यामध्ये असलेली छोटी सिल्व्हर रंगाची पर्स गायब झालेली होती. त्या पर्समध्ये कर्णफुले, डोरले आणि मंगळसूत्र असा ६ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज आणि ५ हजार रुपये रोख होते. तसेच एटीएम कार्ड, वाहन परवाना यासारखी महत्त्वाची कागदपत्र होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV