पिंपळगाव (कु) येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ जण अटकेत
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कु) येथील एका जुगार अड्ड्यावर कुंडलवाडी पोलिसांनी धाड टाकून चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून सुमारे २ लाख ३४ हजार रुपयांचा
पिंपळगाव (कु) येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ जण अटकेत


नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कु) येथील एका जुगार अड्ड्यावर कुंडलवाडी पोलिसांनी धाड टाकून चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून सुमारे २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपळगाव (कु) येथे शेता जवळ काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला. या वेळी काही जण जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले. तसेच रोख २४ हजार ४०० रुपये, जुगाराचे साहित्य आणि चार मोटारसायकली असा एकूण २ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी शिवाजी गंगूलवार यांच्या फिर्यादीवरून जुगार खेळणाऱ्या व्यक्तींसह वाहनमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande