बीड : जमिनीच्या वादातून गेवराईत शेतकऱ्याची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील गौंडगाव शिवारात जमिनीच्या शुल्लक वादातून ५७ वर्षीय शेतकरी यांची काठ्या आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना घडली असून या थरारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेताचा बां
बीड : जमिनीच्या वादातून गेवराईत शेतकऱ्याची निर्घृण हत्या; गुन्हा दाखल


बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील गौंडगाव शिवारात जमिनीच्या शुल्लक वादातून ५७ वर्षीय शेतकरी यांची काठ्या आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना घडली असून या थरारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शेताचा बांध फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. आरोपी तिघांनी संगणमत करून यांना शेतात गाठले आणि त्यांच्यावर अमानुष हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत यांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा मुलगा यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब पवार पुढील तपास आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande