रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरणाऱ्याला अटक
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी शहरातील पाण्याचे मीटर चोरणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतच्या तक्रारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अर्ज झाले होते. गेल्या २४ फेब्रुवारीला बीएसएनएल कार्यालयातून पाण्याचे तीन मीटर चोरल्याची तक्रार
रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरणाऱ्याला अटक


रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी शहरातील पाण्याचे मीटर चोरणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतच्या तक्रारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अर्ज झाले होते. गेल्या २४ फेब्रुवारीला बीएसएनएल कार्यालयातून पाण्याचे तीन मीटर चोरल्याची तक्रार गेल्या 6 मार्च रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातत दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/अंमलदार यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीचे आधारे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित इसम साहिल संजय जाधव (वय-25, रा. फगर वठार, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुरी दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे अन्य दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्याने रत्नागिरी शहरातील एका घरफोडीचीही कबुली दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande