अकोला: ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात भीषण अपघात घडला आहे. मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या जावई आणि साळ्यावर काळाने घाला घातला. वाई गावावरून टिपटाळा या गावाकडे जात असताना दुचाकीस्वारांनी
Photo


अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात भीषण अपघात घडला आहे. मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी परतणाऱ्या जावई आणि साळ्यावर काळाने घाला घातला.

वाई गावावरून टिपटाळा या गावाकडे जात असताना दुचाकीस्वारांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. राज्य महामार्गावर घडलेल्या या अपघातात दुचाकी क्रमांक एमएच 30 एएस 4403 वरील स्वार शरद उत्तमराव डोंगरे यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर रमेश रामदेव जामनिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या मूर्तिजापूर शहर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अपघातानंतर स्पष्ट झाले आहे की, वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अशा दुर्दैवी दुर्घटना कशा घडतात, याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande