
अकोला, 01 एप्रिल (हिं.स.) : अकोल्यात एका पोलिस अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. एका फसवणूक प्रकरणातील महिला आरोपीला शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून एसआय राजेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात पीडित महिला अकोला सायबर पोलिसांनी नोकरी लाऊन देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेली होती. न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आणि नंतर ती महिला आरोपी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली होती.
या ठिकाणी कार्यरत पोलिस अधिकाऱ्याने आरोपी महिला यांना शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना या बाबीची माहिती दिल्यानंतर वरिष्ठांनी तपास सुरू केला आणि थेट एसएसआय जाधव यांना कारवाईसाठी झापले. नंतर राजेश जाधव यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
या घटनेनंतर महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की अशा घटना सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव दर्शवतात आणि उदासीनता निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. मात्र माध्यमांमध्ये या प्रकरणावर संवेदनशीलतेने रिपोर्टिंग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे