अकोल्यात १५ एप्रिल रोजी टीसीेएसच्या भरतीसह रोजगार मेळावा
अकोला, 10 एप्रिल (हिं.स.): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल रोजी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा
अकोल्यात १५ एप्रिल रोजी टीसीेएसच्या भरतीसह रोजगार मेळावा


अकोला, 10 एप्रिल (हिं.स.): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल रोजी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी १० वाजता श्रीमती मेहरबानू कॉलेज येथे होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीद्वारे पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. बीबीए, बी.कॉम., बी.ए., बी.एस्सी (जनरल), बीसीए, बीसीसीए तसेच एम.ए., एम.कॉम. अशा पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

मात्र, केवळ २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असून त्यांनी दिलेल्या लिंकवरून अर्ज भरावा.

निवड प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा आणि त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी अद्ययावत बायोडेटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि ओळखपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. अकोल्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande