कोल्हापुरात सामाजिक समता सप्ताहांतर्गत ‘संविधान जागर’ कार्यशाळा
कोल्हापूर, 10 एप्रिल (हिं.स.): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापुरात ‘संविधान जागर’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांविषयक कार्य' विषयावर कार्यशाळा


कोल्हापूर, 10 एप्रिल (हिं.स.):

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापुरात ‘संविधान जागर’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांविषयक कार्य’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत समतादूत सुनंदा मेटकर, शीतल कोकरे आणि डॉ. रूपा कुलकर्णी यांनी प्रमुख वक्त्या म्हणून सहभाग घेतला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री शिक्षण, समान हक्क, विधवा पुनर्विवाह तसेच महिलांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानातील मूल्ये आणि प्रास्ताविकेचा अर्थ याबाबतही उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमात डॉ. रूपा कुलकर्णी यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले.

या कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहायक संचालक सुनीता नेर्लीकर, सहायक लेखा अधिकारी कविता गायकवाड, पोलीस निरीक्षक केतकी खोत, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, समाज कल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे, स्वाती रुकडे आणि विभागातील कर्मचारी तसेच विचारे माळ परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande