नांदेड - उमरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन
नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)। हदगाव तालुक्यातील उमरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून उमरी (द) येथील ऊरुर्वेला बुद्ध महाविहार येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक भिमजयंती महोत्सव कमिटीच्या व
नांदेड - उमरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन


नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)। हदगाव तालुक्यातील उमरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून उमरी (द) येथील ऊरुर्वेला बुद्ध महाविहार येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक भिमजयंती महोत्सव कमिटीच्या वतीने आयोजित या चार दिवसीय कार्यक्रमात आरोग्य सेवा, कला-क्रीडा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

१२ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भाषण, निबंध आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महामानवाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कमिटीनेकेला आहे. भीमगीतांचा दणदणीत वैचारिक सामना (१३ एप्रिल) १३ एप्रिल रोजी रात्री ९:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम भिमशाहीर गायक सचिन नागवंशी (अमरावती) आणि गायिका रोशनी पाटील (जळगाव-धुळे) यांच्या संचाचा 'बुद्ध-भीम गीतांचा वैचारिक सामना' रंगणार आहे. या प्रबोधनात्मक कार्यक्रमातून भीमरायांच्या विचारांचा जागर केला जाईल.

जयंतीचा मुख्य सोहळा आणि मिरवणूक (१४ एप्रिल) जयंतीच्या मुख्य दिवशी, १४ एप्रिल रोजी कार्यक्रमाची सांगता खालीलप्रमाणे होईलःसकाळी ८:०० वा.: पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण. सकाळी १०:०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची ढोल-ताशांच्या गजरात गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीची सांगता निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण, जयभीम सलामी आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून अत्यंत उत्साहात करण्यात येणार आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande