
अकोला, 11 एप्रिल (हिं.स.) : रजेवर आले असताना शहीद सुशील तेलगोटे यांची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना ठरली असून, घरातील एकमेव कर्ता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी आज शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी पत्नी रोशनी तेलगोटे, वडील दिलीप दयाराम तेलगोटे तसेच इतर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, गजानन गवई, अकोला तालुका अध्यक्ष किशोर जामनिक, तसेच विकास पराग गवई, सुरेंद्र तेलगोटे, मनोज इंगळे, दीपक गोपनारायण, प्रशिक मोरे, मोहन तायडे, दिलीप तेलगोटे, लक्ष्मण तेलगोटे, सुयोग आठवले, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणात न्याय मिळावा, अशीही मागणी व्यक्त करण्यात आली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे