
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
पतपेढीच्या अध्यक्षपदासाठी या निवडणुकीत गायकवाड यांनी 13 पैकी 9 मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या निवडीमुळे कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभारी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष वैभव पाटील, सेक्रेटरी सुदिन कांबळे तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमोल खैरनार यांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून पदभार सुपूर्त केला.
यावेळी पतपेढीचे संचालक सुनील घुटे, महेंद्र पुगावकर, स्नेहल मोरे, निलेश कार्लेकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)