
परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, परभणी शहराच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, महापौर सय्यद इकबाल, माजी महापौर प्रताप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहर महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे यांच्या पुढाकारातून महात्मा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते पार पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis