महात्मा फुले यांच्या विचारात विविध चळवळींची बीजे - डॉ. बबन पवार
परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)। महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद असून त्यांनी स्त्रिया व वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शेतकरी, कामगार आणि सामाजिक न्यायाच्या विविध चळवळींची बीजे त्यांच्या विचारांतच दडलेली होती, असे त्या
महात्मा फुले यांच्या विचारात विविध चळवळींची बीजे – प्राचार्य डॉ. बबन पवार


परभणी, 11 एप्रिल (हिं.स.)। महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद असून त्यांनी स्त्रिया व वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शेतकरी, कामगार आणि सामाजिक न्यायाच्या विविध चळवळींची बीजे त्यांच्या विचारांतच दडलेली होती, असे त्यांनी प्रतिपादन प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी केले. ते परभणी येथील शारदा महाविद्यालयात गणित विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन पवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे यांनीही आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. संतोष नाकाडे यांनी देशभरात महात्मा फुले यांची द्विशताब्दी विविध उपक्रमांद्वारे साजरी केली जात असून महाविद्यालयातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande