बीडमध्ये दारुड्या मुलाचा राडा; वडिलांवर कोयत्याने वार
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा येथे दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत घरातील दुचाकी नेण्याचा हट्ट केला. वडिलांनी त्या
बीडमध्ये दारुड्या मुलाचा राडा; वडिलांवर कोयत्याने वार


बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा येथे दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत घरातील दुचाकी नेण्याचा हट्ट केला. वडिलांनी त्याला मज्जाव केला असता त्याने चिडून दोन दुचाकींची तोडफोड केली आणि वडिलांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने गंभीर वार केले. संतापलेल्या सचिनने केवळ वडिलांनाच नव्हे, तर वाद सोडवण्यास आलेल्या भावाला आणि सुनेलाही मारहाण केली.

क्रूरतेचा कळस गाठत त्याने लहान मुलगी कोमल हिला उचलून फेकून दिले आणि घरातील सामानाचे नुकसान केले. जखमी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande