बालनाट्य-किर्तन कार्यशाळा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास पोषक - डॉ. चिंधे
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। वर्तमान काळात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात असणे गरजेचे असून यासोबतच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य रूजवणे आवश्यक बनले आहे. या पाचदिवसीय कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना नाट्यकौशल्य व नैतिक मूल्ये व संतविचारांच
बालनाट्य-किर्तन कार्यशाळा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास पोषक - डॉ. चिंधे


बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। वर्तमान काळात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात असणे गरजेचे असून यासोबतच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य रूजवणे आवश्यक बनले आहे. या पाचदिवसीय कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना नाट्यकौशल्य व नैतिक मूल्ये व संतविचारांचा परिचय होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधला जाईल, असे प्रतिपादन बलभीम महाविद्यालयाचे

आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. अनिल चिंधे यांनी केले.

येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग व श्री. विज्ञानेश्वर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शिदोड येथे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांच्या मार्गदर्शनात बालनाट्य-किर्तन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

मंचावर उद्घाटक म्हणून श्री. संत जांबुवंत कृपा आध्यात्मिक गुरूकुलचे संस्थापक ह.भ.प. आकाश महाराज म्हस्के, प्रमुख पाहुणे श्री. विज्ञानेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.कृष्णा महाराज वेताळ तर प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रविंद्र काळे होते.

आपल्या उद्घाटकीय मार्गदर्शनात ह.भ.प. आकाश महाराज म्हस्के म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांना शास्त्रोक्त ज्ञान मिळणार असून त्यांच्यातील कौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी ह.भ.प.कृष्णा महाराज वेताळ म्हणाले, या पाच दिवसीय कार्यशाळेतून मुले आवश्यक ते विविध ज्ञान संपादनासोबतच नाट्य कौशल्य व नितीमूल्ये शिकतील ज्यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत मिळेल. समारंभाच्या सुरूवातीस सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रविंद्र काळे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका मांडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande