नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला
नांदेड, 15 एप्रिल, (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात'' (Heat Stroke) होण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद ना
नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला


नांदेड, 15 एप्रिल, (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात' (Heat Stroke) होण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, परंतु योग्य काळजी घेतल्यास आपण त्यापासून वाचू शकतो. आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

तहान लागलेली नसली तरीही वारंवार पाणी प्या. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS) किंवा घरगुती उपलब्ध असलेल्या पेयांचा वापर करा, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील. बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.

दुपारची वेळ टाळा -दुपारी १२ ते ३:३० या वेळेत कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. पचायला हलके आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले हंगामी फळे (कलिंगड, संत्री, द्राक्षे) खावीत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande