अंबाजोगाईत अत्याधुनिक 'स्वयंचलित कॉइन शौचालय' कार्यान्वित
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)। का अ अंबाजोगाई शहरात सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेमार्फत ''सिंगल सीट कॉइन ऑपरेटेड ऑटोमॅटिक टॉयलेट'' (Electronic Toilet) ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाचे औपचारिक लोकार्पण
अ


बीड, 17 एप्रिल (हिं.स.)। का अ

अंबाजोगाई शहरात सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेमार्फत 'सिंगल सीट कॉइन ऑपरेटेड ऑटोमॅटिक टॉयलेट' (Electronic Toilet) ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाचे औपचारिक लोकार्पण आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शहराला 'स्मार्ट सिटी' बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहाचा अनुभव मिळणार आहे. हे शौचालय पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून कॉइन टाकून त्याचा वापर करता येईल. यामुळे कमी वेळेत स्वच्छता राखणे आणि सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावणे शक्य होणार आहे. याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण आणि आधुनिक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस नगर परिषदेने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande