परतवाड्यात अय्यान - हुसेन दोन मित्रांचा वाद ठरला मुलींसाठी विनाशकारी
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) परतवाडा-अचलपूर परिसरात दोन तरुणांमधील वादातून अनेक मुलींचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून
अय्यान - हुसेन दोन मित्रांचा वाद ठरला मुलींसाठी विनाशकारी स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) परतवाडा-अचलपूर परिसरात दोन तरुणांमधील वादातून अनेक मुलींचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अय्यान आणि त्याचा मित्र हुसेन हे दोघे सोशल मीडियावर सक्रिय होते. अय्यान हा स्वतःला यूट्यूबर म्हणून सादर करत मुलींशी ओळखी वाढवत असे. त्याच्या सोशल मीडिया खात्यांवर अनेक मुली फॉलोअर्स म्हणून जोडल्या गेल्या होत्या. या ओळखीचा गैरफायदा घेत तो मुलींशी चॅट करत त्यांना भेटण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे.भेटीनंतर संबंधित मुलींसोबत फोटो आणि व्हिडिओ काढले जात होते. हे फोटो-व्हिडिओ नंतर त्याचा मित्र हुसेनकडे पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये मुलींना जाळ्यात ओढण्याची जणू काही स्पर्धाच सुरू होती, असा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, काही कारणांमुळे अय्यान आणि हुसेन यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचे कारण पैशांशी संबंधित असल्याची चर्चा असून, त्यानंतर हुसेनने संतापाच्या भरात अय्यानकडून मिळालेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक मुलींची बदनामी झाली असून, त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक आघात झाला आहे.

या घटनेनंतर परतवाडा-अचलपूर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांचा गैरवापर करून मुलींना फसवण्याच्या या प्रकारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून, तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखींबाबत सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच, संबंधित आरोपींवर कडक कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande