डोंबिवलीत सँडविच विक्रेत्याने केला पालिका अधिकाऱ्यावर हल्ला
डोंबिवली, 17 एप्रिल (हिं.स.)। एमआयडीसी विभागातील पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. पालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकातील अधिकाऱ्याला कारवाई करताना मारहाण करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधात कारवाई करत असताना एका
कारवाई हल्ला


डोंबिवली, 17 एप्रिल (हिं.स.)।

एमआयडीसी विभागातील पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. पालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकातील अधिकाऱ्याला कारवाई करताना मारहाण करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधात कारवाई करत असताना एका सँडविच विक्रेत्याने अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला केला असल्याचे समोर येत आहे. पालिका अधिकारी सुरेश कामराज जखमी झाले परिणामी त्यांना उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर येतच शहरात खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. यावेळी कारवाईला विरोध करत तेथील एका सँडविच विक्रेत्याने लागलीच अधिकाऱ्यावर हल्ला केला. मारहाणीत बांबूने मारहाण केल्यामुळे कामराज हे गंभीर जखमी झाले आहेत.

फेरीवाल्यांच्या या घटनेचा नागरिकांनी निषेध केला असून फेरीवाल्यांच्या अशा वाढत्या दादागिरीवर ताबडतोब इलाज करण्याचीआगणी केली आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande