बस प्रवासात स्मार्ट कार्डशिवायही जेष्ठ, दिव्यांगांना सवलत कायम; अफवांवर विश्वास ठेवू नका
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)।राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात जेष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांना स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही, अशी अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी याबाबत स्पष्टीकरण देत नागरिका
बस प्रवासात स्मार्ट कार्डशिवायही जेष्ठ, दिव्यांगांना सवलत कायम; अफवांवर विश्वास ठेवू नका


परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)।राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात जेष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांना स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही, अशी अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी याबाबत स्पष्टीकरण देत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्र एसटी महामंडळामार्फत 65 वर्षे व 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या निर्णयानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा कायम सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यभर स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असली तरी स्मार्ट कार्ड नसल्यामुळे सवलत बंद केली जाईल, ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे.

सध्या ज्या पात्र जेष्ठ व दिव्यांग प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही, त्यांनाही नियमांनुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाने गैरसमज करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सवलतीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात असून पात्र प्रवाशांनी आपले स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे, असे आवाहनही शेवटी आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande