युरिया व डीएपी विक्रीसाठी लेखी ‘स्पष्ट गाईडलाईन्स’ देण्याची मागणी
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)। : जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी 17 एप्रिल पासुन युरिया व डीएपी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी युरिया व डीएपी विक्री बाबत ची गाईडलाईन्स स्पष्ट व लेखी स्वरुपात जोपर्यंत
बंद


लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)।

: जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी 17 एप्रिल पासुन युरिया व डीएपी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी युरिया व डीएपी विक्री बाबत ची गाईडलाईन्स स्पष्ट व लेखी स्वरुपात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही डीएपी व युरिया उतरवून घेणार नाही व विक्री करणार नाही असे निवेदन लातूर जिल्हा कृषि अधिकारी यांना फर्टीलायझर्स, पेस्टीसाईडस् ॲण्ड सीडस् डिलर्स असोसिएशनच्यावतीने देण्यात आले आहे.

प्रशासनाकडून युरिया व डीएपी विक्री बाबत ची गाईडलाईन्स स्पष्ट व लेखी स्वरुपात मिळत नाही तोपर्यंत जिल्हयातील सर्व विक्रेते युरिया व डीएपीची खरेदी व विक्री आज, शुक्रवारपासून बंद करत आहेत, असा स्पाष्ट इशारा लातूर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी गाईडलाईन्स’ फर्टीलायझर्स, पेस्टीसाईडस् ॲण्ड सीडस् डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रदीप अण्णा सोनवणे, राजाभाऊ शिंदे, सतीश देशमुख, विजय पोपडे, लक्ष्मीकांत बंग, चाकूते सिद्राम, राजेश मद्रेवार, महादू शिरसाट यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande