
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)। परळी तालुक्यातील मलनाथपूर येथील नळ पाणी पुरवठा योजनेला महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १८६.५२ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, जल जीवन मिशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मूळतः ६७.७१ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या योजनेची किंमत वस्तू व सेवा करातील वाढ आणि तांत्रिक कारणांमुळे वाढली असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या दैनंदिन देखभालीसाठी, दुरुस्तीसाठी आणि वीज बिलांच्या देयकांसाठी भविष्यात शासनाकडून कोणतीही अतिरिक्त आर्थिक मदत मिळणार नसून, ही संपूर्ण जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीची असेल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis