परभणी - राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 मे रोजी आयोजन
परभणी, 17 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवारी (दि. 09 मे) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्यामार्फत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील संबंधित न्यायालय परिसरात
परभणी - राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 मे रोजी आयोजन


परभणी, 17 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवारी (दि. 09 मे) रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्यामार्फत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील संबंधित न्यायालय परिसरात करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881 अंतर्गत चेक बाऊन्स प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वाद, भू-संपादन प्रकरणे, वीज (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे तसेच इतर दिवाणी स्वरूपाची प्रकरणे आणि बँकांची वादपूर्व वसूली प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

लोकअदालतीत न्यायाधीश व वकील यांचे पॅनल पक्षकारांना मार्गदर्शन करून तडजोडीअंती जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यास सहाय्य करणार आहे. या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ज्या नागरिकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीकडे 09 मे 2026 पूर्वी अर्ज सादर करून आपली प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोक अदालतीचे फायदे : निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फी परत मिळते. एकाच दिवशी निपटारा झाल्याने वेळ व खर्चाची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये समन्वयाने वाद मिटविल्यामुळे कटुता निर्माण होत नाही. राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त तडजोडपात्र प्रकरणे ठेवून ती निकाली काढण्याचे आवाहन परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande