संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात प्रमुख नागरिक संघोष्टींचे आयोजन
जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध शहरांमध्ये प्रमुख नागरिक संघोष्टींचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग अपेक्षित आहे.जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि अ
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात प्रमुख नागरिक संघोष्टींचे आयोजन


जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध शहरांमध्ये प्रमुख नागरिक संघोष्टींचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग अपेक्षित आहे.जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि अमळनेर या चार शहरांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांमधून समाजातील विविध घटकांमध्ये संवादाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

भुसावळ येथे जळगाव रोडवरील प्रभाकर हॉलमध्ये 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरात भैय्यासाहेब गंधे बहुउद्देशीय सभागृहात 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8.30 या वेळेत कार्यक्रम होणार आहे.

चाळीसगाव शहरातील पाटीदार भवन (भडगाव रोड) येथे 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संघोष्टीचे आयोजन करण्यात आले आहे. तर अमळनेर शहरातील कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह (प्रताप कॉलेज परिसर) येथे 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम होणार आहे.

या संघोष्टींमध्ये डॉक्टर, अभियंते, वकील, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्ती, तसेच उद्योग, व्यापार, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि रिक्षा युनियनचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल हे जळगाव व भुसावळ येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तसेच अमळनेर येथील कार्यक्रमात अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर मार्गदर्शन करणार आहेत.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे विविध क्षेत्रांतील नागरिकांना एकत्र येऊन समाजाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande