
प्रकरणाची सखोल चौकशी करा; आ. अभिमन्यु पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांना सुचना
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
लातूर शहरातील एमआयडीसीत असलेल्या मुंदडा अल्युमिनियम इंडस्ट्रीला आग लागली. या आगीत होरपळून एका कामगाराचा मृत्यू झाला आणि एक कामगार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समजताच आ. अभिमन्यु पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याशी फोनवर संपर्क साधून मुंदडा अल्युमिनियम इंडस्ट्रीमध्ये गॅस सिलेंडर का साठविण्यात आले होते याची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.
याबाबतची आ. अभिमन्यु पवार यांनी स्व:ता सोशल माध्यमात पोस्ट करुन माहिती दिली आहे.
----
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis