जळगाव : वन विभागाने विहिरीत पडलेल्या बिबट मादीला सुखरूप बाहेर काढले
जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) शिवापुर शिवारात एका शेतातील विहिरीत पडलेला बिबट्याला वनविभागाच्या अथक प्रयत्नाने विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले आहे. शिवापूर येथील अशोक नामदेव राजपूत यांच्या मालकी गट क्र 137/2 या शेतातील विहिरीत शिकारीच्या
विहिरीत पडलेल्या बिबट मादीला सुखरूप बाहेर काढले


विहिरीत पडलेल्या बिबट मादीला सुखरूप बाहेर काढले


जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) शिवापुर शिवारात एका शेतातील विहिरीत पडलेला बिबट्याला वनविभागाच्या अथक प्रयत्नाने विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले आहे. शिवापूर येथील अशोक नामदेव राजपूत यांच्या मालकी गट क्र 137/2 या शेतातील विहिरीत शिकारीच्या शोधात असलेली एक बिबट मादी पडली होती, आज सकाळी शेतकरी अशोक राजपूत हे शेतात गेल्यावर त्यांना सदर बाब लक्षात आली. शिवापूर गावाचे पोलीस पाटील गोपाल नामदेव पाटील यांनी तात्काळ सदर माहिती वनविभागास कळवली. वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांनी लागलीच सर्व कर्मचारी व साहित्य यांची जमवाजमव सुरु केली. सदर ठिकाणी बघ्यांची खुप गर्दी असल्याचे कळाल्याने सदर बाब चाळीसगाव ग्रामीण पो. स्टे. चे एपीआय नितीन पाटील यांना कळवून पोलीस कर्मचारी तैनात करण्याबाबत कोमल पिंडकुरवार मॅडम यांनी कळवले. वनरक्षक के. बी. पवार, उमेश सोनवणे, वनमजूर संजय देवरे,बाळू शितोळे यांना पुढे जाण्याच्या सूचना देऊन पोलीस पाटील,शेतकरी आणि गावाकऱ्यांच्या मदतीने एक बाज विहिरीत सोडली जेणेकरून बिबट मादी बाजेवर बसून सुरक्षित होईल. बाज विहिरीत सोडताच सदर बिबट मादी बाजेवर येऊन बसली. यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार ह्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. सोबत आणलेला एक पिंजरा वनकर्मचारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत सोडण्यात आला. काही क्षणातच बिबट मादी पिंजऱ्यात जाऊन बसली. पिंजऱ्याचे गेट बंद करून पिंजरा विहिरीतून बाहेर काढत सुरक्षित केले. सदर पकडलेल्या बिबट मादीस पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मेहेत्रे यांच्याकडून तपासणी करण्यात आली असून सदर बिबट मादीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

सदर कार्यवाही वनसंरक्षक (प्रा.) धुळे,. राम धोत्रे उपवनसंरक्षक जळगाव वनविभाग जळगाव, अमोल पंडित, सहाय्यक वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव जळगाव, विवेक देसाई मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार,वनपाल सागर पाटील,सी व्ही पाटील वनरक्षक के बी पवार, उमेश सोनवणे यांनी केली. सोबत पोलीस कर्मचारी भगवान माळी आणि प्रवीण संगिले गावातील नागरिकांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande