बीड - नगरसेविका देशपांडे यांच्या पतीवरील खोटा गुन्हा मागे घ्यावा, शिष्टमंडळाने घेतली एसपींची भेट !
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)। निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावरच खोटा गु
बीड - नगरसेविका देशपांडे यांच्या पतीवरील खोटा गुन्हा मागे घ्यावा, शिष्टमंडळाने घेतली एसपींची भेट !


बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।

निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच कारवाई करावी आणि या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करून घेणाऱ्या यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कबाड गल्ली येथे आपल्या घरासमोर उभे असलेले सागर देशपांडे यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला.

यावेळी सागर देशपांडे हे एकटेच होते. त्यांचे वडील घराच्या गॅलरीत उभे होते. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध आहे. हा सर्व प्रकार झाल्यानंतर बीड शहर पोलिसांनी जाधव यांच्या तक्रारीवरून सागर देशपांडे आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. सीसीटिव्ही फुटेजमध्ये अरुणराव देशपांडे हे घटनास्थळी हजर नाहीत, घराच्या गॅलरीत आहेत हे दिसत असतानाही जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करून घेतल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. डॉ. योगेश क्षीरसागर, भाजप अशोक लोढा, दिलीप खिस्ती, महेश वाघमारे, अॅड. संगीता धसे, भाग्यश्री देशपांडे, अॅड. बाळासाहेब बाहेगव्हाणकर, प्रसाद राजेंद्र, अॅड. दीपक कुलकर्णी, अॅड. आनंद पाटील, नगरसेवक जगदीश गुरखूदे, नगरसेवक शुभम धूत, डॉ. रवींद्र घुमरे आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande