रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात नि:शुल्क उन्हाळी योग शिबिर
रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन १० दिवसीय निःशुल्क उन्हाळी योग शिबिराचे आयोजन केले आहे. हे
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात नि:शुल्क उन्हाळी योग शिबिर


रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन १० दिवसीय निःशुल्क उन्हाळी योग शिबिराचे आयोजन केले आहे.

हे निःशुल्क उन्हाळी योग शिबिर दि. २७ एप्रिल ते ७ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात योगवर्ग होणार आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. सोबतच याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा स्त्रियांना होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गृहिणी अशा सर्वच वयोगटासाठी या उन्हाळी योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जास्तीत जास्त स्थानिक रत्नागिरीकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (7798490615) आणि प्रा. पल्लवी वंजारी (8308242570) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande