
लातूर, 19 एप्रिल (हिं.स.)।
शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या 'BLA विधानसभा प्रमुख' पदी जनार्दन भालेराव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे जनार्दन भालेराव यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात शिवसेना महाराष्ट्र राज्य सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कुर्ला मतदारसंघाचे आमदार तथा लातूर लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या शुभहस्ते जनार्दन भालेराव यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या नियुक्ती सोहळ्यावेळी शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा संघटक सुधाकरजी भालेराव साहेब, शिवसेना लातूर जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख ॲड. श्रीनिवासजी क्षीरसागर साहेब, जिल्हाप्रमुख चंद्रकांतजी टेंगटोल पाटील, डॉक्टर सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर तानाजी चंदावार साहेब, ग्राहक मंच मुंबईचे बिराजदार साहेब, प्राचार्य चवळे सर, तसेच महिला संपर्कप्रमुख कुलकर्णी ताई व महिला जिल्हाप्रमुख भगत मॅडम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष संघटनेला मिळणार बळकटी
जनार्दन भालेराव यांची प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पाहता, त्यांच्या निवडीमुळे अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील बूथ लेव्हल एजंट (BLA) यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल मतदारसंघातील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला असून जनार्दन भालेराव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis