कोल्हापूरात आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव, शंकराचार्य पीठाचे पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, 20 एप्रिल (हिं.स.)। श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. त्यानिमित्त जन्मकाळ, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले आहे. तसेच मंदार पुजारी, सीताराम जोशी, रा
करवीर पीठाचे प.पु. श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी


कोल्हापूर, 20 एप्रिल (हिं.स.)। श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. त्यानिमित्त जन्मकाळ, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले आहे. तसेच मंदार पुजारी, सीताराम जोशी, रामचंद्रबुवा भिडे, योगेश खरे यांच्यासह मान्यवरांना शंकराचार्य पीठाचे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती करवीर पीठाचे प.पु. श्री विद्यानृसिंह भारती स्वामीजी यांनी दिली.

श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा २५३४ वा जयंती उत्सव येथील करवीर पीठामध्ये २६ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देताना स्वामीजी बोलत होते.

ते म्हणाले, २६ एप्रिलला ऋग्वेद संहितेचा देवतांना अभिषेक, दशोपनिषद वाचन, गीताभाष्य आणि ब्रह्मसूत्रभाष्य पारायण या दैनंदिन कार्यक्रमांनी उत्सवाची सुरवात होईल. त्यानंतर जन्मकाळ, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले आहे. याचवेळी दररोज होमहवन व सायंकाळी गायनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे.

३० एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पुरस्कार वितरण होईल. यामध्ये वैदिक पुरस्कार वे.शा.सं. मंदार महेश पुजारी (नृसिंहवाडी), सांस्कृतिक पुरस्कार वे.शा.सं. डॉ. सीताराम नारायण जोशी (परभणी), कीर्तनकार पुरस्कार हभप रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (पुणे), स्थानिक वैदिक पुरस्कार वे.शा.सं योगेश मुरलीधर खरे (कोल्हापूर), सामाजिक गौरव डॉ. हेमंत विंझे (मुंबई), महिला कीर्तनकार हभप सौ. वर्षा वसंत बेडेकर (नागपूर), होतकरू विद्यार्थी वेदांत कुमार जोशी (नांदेड), चिन्मय बाळकृष्ण कुलकर्णी (जालना), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी विजय जोशी (पुणे), विशेष गौरव पंडित पराग चौधरी (संभाजीनगर) यांना शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. १ मे रोजी महाप्रसाद व पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता होईल. यावेळी पीठामध्ये दुपारी ४ वाजता पालखीचे पूजन होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी लवाजमासह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास जाईल. तेथून पुन्हा पीठात येईल. यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande