कर्नाटकात काँग्रेस आमदाराच्या मुलांवर ईडीचे छापे
बंगळुरू, 20 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटकातील काँग्रेस आमदार एन.ए. हॅरिस यांच्या मुलांशी संबंधित ठिकाणांसह एकूण 12 परिसरांवर सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. ही कारवाई क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भ
ईडी लोगो


बंगळुरू, 20 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटकातील काँग्रेस आमदार एन.ए. हॅरिस यांच्या मुलांशी संबंधित ठिकाणांसह एकूण 12 परिसरांवर सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. ही कारवाई क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार ही छापेमारी 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट' (पीएमएलए) अंतर्गत श्रीकृष्ण रमेश उर्फ श्रीकी आणि इतर आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे.

बंगळुरूसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या या छाप्यांमध्ये आमदार एन.ए. हॅरिस यांची मुले मोहम्मद हॅरिस नलापड आणि ओमार फारुख नलापड यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. तपासानुसार, आरोपींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेबसाइट्स हॅक करणे, बिटकॉइन चोरी, खंडणी आणि ड्रग्ज (एनडीपीएस) कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. आरोपी वेबसाइट्स आणि क्रिप्टो वॉलेट्स हॅक करून डिजिटल मालमत्ता चोरायचे. त्यानंतर क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे ती विकून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांद्वारे फिरवून (Layering) वैयक्तिक फायद्यासाठी वापरला जात असे.

एन.ए. हॅरिस हे शांतीनगर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आहेत. ईडीच्या मते, त्यांचे दोन्ही मुलगे मुख्य आरोपी 'श्रीकी'चे जवळचे सहकारी असून या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचे ते मुख्य लाभार्थी आहेत.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande