छत्तीसगड : जशपूरमध्ये विमान अपघाताची अफवा
घटनास्थळाच्या पाहणीनंतर प्रशासनाने केला इन्कार जशपूर, 20 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या जशपूर येथे सोमवारी चार्टर्ड विमान कोसळल्याची बातमी वेगाने पसरली, परंतु ती पूर्णपणे अफवा असल्याचे सिद्ध झाले. रतनपहली जंगल परिसरातील डोंगराळ भागात धूर निघताना प
छत्तीसगडमध्ये डोंगराला धडकून विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू


घटनास्थळाच्या पाहणीनंतर प्रशासनाने केला इन्कार

जशपूर, 20 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या जशपूर येथे सोमवारी चार्टर्ड विमान कोसळल्याची बातमी वेगाने पसरली, परंतु ती पूर्णपणे अफवा असल्याचे सिद्ध झाले. रतनपहली जंगल परिसरातील डोंगराळ भागात धूर निघताना पाहून स्थानिक ग्रामस्थांना वाटले की एखादे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. तसेच यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ही अफवा देशभर पसरली. परंतु, प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केल्यानंर हा प्रकार अफवा असून घटनास्थळी दिसणारा धूर जंगलातील झुडपे जळल्यामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कथित विमान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून खुरासागड बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जशपूरचे जिल्हाधिकारी रोहित व्यास आणि एसएसपी डॉ. लाल उमेद सिंह यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली, मात्र विमानाचे कोणतेही अवशेष किंवा अपघाताचे पुरावे सापडले नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी रोहित व्यास यांनी स्पष्ट केले की, कोणताही अपघात झालेला नाही. जंगलात लागलेल्या आगीमुळे निघणाऱ्या धुरामुळे ही अफवा पसरली आहे. सध्या पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या पथकांद्वारे ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने परिसरावर लक्ष ठेवले आहे. जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत अपघाताचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील नारायणपूरच्या डोंगरात विमान कोसळल्याच्या बातम्या देशभर प्रसारित झाल्या होत्या, ज्यावर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की अशा कोणत्याही अपघाताची माहिती नाही. तपासादरम्यान झारखंड आणि ओडिशाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशीही (एटीसी) संपर्क साधण्यात आला. दोन्ही ठिकाणाहून खात्री करण्यात आली की, त्या भागात अशा कोणत्याही विमानाचे उड्डाण नव्हते ज्याचा संपर्क तुटला असेल. त्यामुळे डोंगरावरील धूर पाहून स्थानिकांकडून जारी झालेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande