
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। तीन बोलेरो पिकअप वाहनात लहान मोठ्या असे एकूण १४ गोवंश दाटीवाटीने कोंबून विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालकांविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १४ गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.
सेलू पोलिसांचे पोलीस चालक मोहम्मद अतिक मोहम्मद युनूस हे पोलीस हवालदार मारुती जाधव, होमगार्ड सय्यद यांच्यासोबत सेलू शहरात गस्तीवर असताना शहरातील रायगड कॉर्नर परिसरात परतूरच्या दिशेने बोलेरो वाहन येत असल्याचे पाहून पोलीस हवालदार जाधव यांनी या तिन्ही वाहनास थांबविले. वाहन चालकांना नावे विचारली यावेळी तिन्ही वाहनांची तपासणी केली असता बोलेरो पिकअप वाहन पाच गोवंश, वाहन म व पाच गोवंश आणि वाहनमध्ये चार गोवंश अशी एकूण तिन्ही वाहनांत मिळून १४ गोवंश आढळून आली. वाहन चालकांकडे गोवंश वाहतुकीचा तसेच गोवंश दाखल्यांची विचारपूस केली असता कुठलेही कागदपत्रे सादर करता आली नाही. या वाहनात गोवंशाच्या तोंडाला घट्ट बांधून दाटीवाटीने भरून कोणत्याही प्रकारची चारापाणी आणि इतर उपचार व्यवस्था न करता बेकायदेशीर विनापरवाना क्रूरतेने कोंडून वाहतूक करताना आढळून आल्याने घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक तेलंगे, पोलीस हवालदार नितीन राठोड, कांगणे आदींसोबत घटनास्थळी धाव घेतली.
या कारवाईत वाहनचालक याच्या ताब्यातील वाहनसहित पाच गोवंश ज्याची एकूण किंमत ६ लाख २१ हजार रुपये एवढी आहे ताब्यात घेण्यात आले. ज्याची एकूण किंमत ५ लाख ६४ हजार एवढी आहे ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १४ गोवंश आणी तिन्ही वाहनासह एकूण १७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यातून १४ गोवंशाची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस चालक मोहम्मद अतीक मोहम्मद युनुस शेख यांच्या फिर्यादीवरून बेकायदेशीर विनापरवाना वाहनात क्रुरतेने गोवंश वाहतूक करीत असताना आढळून आल्याने सेलू पोलिसांत प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार नितीन राठोड करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis