अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई शहरात एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून फसवणूक, अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल
अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार


बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। अंबाजोगाई शहरात एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून फसवणूक, अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळची लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पीडितेने आरोपीवर लग्नासाठी सक्ती केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आरोपीने सुरुवातीला विवाहाचे आश्वासन देऊन तिच्याशी संबंध प्रस्थापित केले, मात्र नंतर विवाहासाठी अट घालत तिला शिवीगाळ व धमकी दिली. अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध सुरू आहे. एका महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन केलेल्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून सामाजिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande