अमरावती - लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
अमरावती, 21 एप्रिल, (हिं.स.)। परतवाडा येथील लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंग प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड समोर आली. पोलिस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी
परतवाडा लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी


अमरावती, 21 एप्रिल, (हिं.स.)। परतवाडा येथील लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंग प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड समोर आली. पोलिस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता न्यायालयाने ही मागणी मान्य केली.या प्रकरणातील आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद, उजैर खान इकबाल खान, मो. साद मो. साबिर आणि तबरेज खान तसलीम खान यांना अचलपूर न्यायालयाने २७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढीव पोलिस कोठडी मंजूर केली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीची नावे..

1. अयान अहमद तन्वीर अहेमद (मुख्य आरोपी.)

2. उजैर खान इकबाल खान (सह आरोपी)

3. मो. साद मो. साबिर

4. तबरेज खान तसलीम खान

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande