लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६: कार्लोस अल्काराझ आणि आर्यना सबालेन्काचा गौरव
माद्रिद, २१ एप्रिल (हिं.स.) । प्रतिष्ठित लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये टेनिसपटूंचे वर्चस्व होते. स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराझ आणि बेलारूसची आर्यना सबालेन्का यांना अनुक्रमे महिला आणि पुरुष गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हण
कार्लोस अल्काराझ आणि आर्यना सबालेन्का


माद्रिद, २१ एप्रिल (हिं.स.) । प्रतिष्ठित लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये टेनिसपटूंचे वर्चस्व होते. स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराझ आणि बेलारूसची आर्यना सबालेन्का यांना अनुक्रमे महिला आणि पुरुष गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

अल्काराझने फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन ही दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकून वर्षाचा शेवट जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी केला. सबालेन्काने संपूर्ण हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत अनेक मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

नोव्हाक जोकोविच आणि आयलीन गु यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. २००० साली स्थापित झालेले लॉरियस अवॉर्ड्स हे क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक मानले जातात.

-लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६ चे मुख्य विजेते

वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू: कार्लोस अल्काराझ

वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू: आर्यना सबालेन्का

वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ: पॅरिस सेंट-जर्मेन

वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू: लँडो नॉरिस

वर्षातील सर्वोत्कृष्ट पुनरागमन: रॉरी मॅकिलरॉय

वर्षातील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू: लॅमिन यामाल

क्रीडा प्रेरणा पुरस्कार: टोनी क्रूस

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande