इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाईचे आदेश; पालकांना दिलासा
अकोला, 25 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या स्टेट बोर्ड, सीबीएसई व आयसीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तके, गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने कठोर भूमि
इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाईचे आदेश; पालकांना दिलासा


अकोला, 25 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या स्टेट बोर्ड, सीबीएसई व आयसीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तके, गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

भाजपा ओबीसी मोर्चा, अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे यांनी याबाबत राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. त्यात इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीची दखल घेत शिक्षण संचालकांनी सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्पष्ट आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.

तसेच अशा प्रकारची सक्ती करणाऱ्या शाळांविरोधात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार असून पालकांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande