नांदेड जिल्ह्यात २९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर
नांदेड, 25 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे झालेली दयनीय आर्थिक अवस्था लक्षात घेता आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्याचे
नांदेड जिल्ह्यात २९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर


नांदेड, 25 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे झालेली दयनीय आर्थिक अवस्था लक्षात घेता आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्याचे अनुषंगाने विधानसभेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून २४ कोटी ५० लाख रुपयांचा विमा नांदेड शहर व ग्रामीण साठी मंजूर करण्यात आला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्ट मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात नांदेड शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. या भागातील ३१ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला पाहिजे यासाठी आ. बोंढारकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर बोंढारकरांच्या प्रयत्नांना यश आले असून २९ हजार शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. २४ कोटी ५० लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांना लाभ होईल अशी माहिती ही आ. बोंढारकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande