
बीड, 25 एप्रिल, (हिं.स.)। परळी येथील नवगण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कला, वाणिज्य व बीसीए शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी म्प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, प्रख्यात कवी व साहित्यिक श्री. भागवत मसणे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, डॉ. मधुकर आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवी भागवत मसणे यांनी 'सेल्फीच्या नादाने पिंडालाही कावळा
शिवेना' या प्रभावी वाक्याच्या माध्यमातून आधुनिक तरुणाईच्या बदलत्या जीवनशैलीवर भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत जीवनमूल्यांची जपणूक करावी, असे आवाहन केले. तर डॉ सुधाकर गुट्टे यांनी पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून उभे राहावे व उज्वल भारत घडवावा असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis