
बीड, 25 एप्रिल, (हिं.स.)। विविध कौशल्य व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी विविध कला व कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे. त्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्या हाताला लवकरात लवकर काम मिळते. आपल्या देशाला आज युवकांच्या ऊर्जेची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. सारिका क्षीरसागर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व केएसके कॉलेज यांच्या वतीने पदवीदान समारंभ पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून स्वा. सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे, डॉ. विश्वांभर
देशमाने, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ. अनिता शिंदे, डॉ. ए.एस. खान, डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. सुहास मोराळे म्हणाले, आपण आजपर्यंत म्हणत आलो की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरीक आहे. आता याच्यामध्ये बदल करुन आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरीक आहे. असे गृहीत धरुन आपण जबाबदारीपुर्वक वागावे. त्याबरोबरच आपल्याला आजच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःला लायक बनवावे. संघर्ष हा प्रत्येक क्षेत्रात आहे. विविध संधी शोधा आपल्याकडे कोणते ना कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis