
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 चे एक्झिट पोल जाहीर झाले असून राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसत आहेत.
एकूण 234 विधानसभा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत डीएमके आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर एआयडीएमके आघाडी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने मात्र उल्लेखनीय कामगिरी करत लक्ष वेधले आहे. विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार डीएमके आघाडीला 120 ते 140 जागा मिळू शकतात. तर एआयडीएमके आघाडीला 87 ते 145 जागा मिळू शकतात आणि नवोदित टीव्हीके पक्षाला 6 ते 25 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. येत्या 4 तारखेला सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत जयपराजयाचे चित्र स्पष्ट होईलच. परंतु, बहुंतांश एक्झिट पोल्सने टीव्हीके पक्षाच्या राजकीय उदयाचा अंदाज वर्तवला आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis