
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।
मिस्त्री काम करणाऱ्या एका कामगारास उसने दिलेले पैसे परत मागितले असता त्याने अश्लील शिवीगाळ करून तसेच थापडबुक्यांनी मारहाण करून पैसे देत नाही असे म्हटल्याने गुत्तेदाराने नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
बांधकाम गुत्तेदार यांनी आठ महिन्यांपूर्वी बांधकाम मिस्त्री शेख निसार शेख जाफर रा. अजिजीयानगर परभणी यास १ लाख २५ हजार रुपये हात उसने म्हणून पाचशे रुपयांच्या बॉर्ड पेपरवर करारनामा करून आठ दिवसांत परत देण्याच्या अटीवर दिले होते. मात्र अनेक महिने उलटूनही पैसे परत न दिल्याने तसेच मोबाईल नंबर बंद येत असल्याने बांधकाम गुत्तेदार चिंतेत होता. दरम्यान, सोमवारी बांधकाम मिस्त्री शेख निसार शहरातील जिंतूर रस्ता परिसरातील एका हॉटेल परिसरात दिसला असता उसने दिलेले पैसे परत मागितले असता त्याने अश्लील शिवीगाळ करून तसेच थापडबुक्क्यांनी मारहाण करून पैसे देणार नाही अशी धमकी दिली. यावरून बांधकाम गुत्तेदार यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नारायण पोले हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis