थॉमस कप २०२६: चीनची भारतावर 3-2 ने मात; लक्ष्य सेन, सात्विक-चिराग जोडीकडून निराशा
कोपनहेगन, 30 एप्रिल (हिं.स.)थॉमस कप २०२६ मध्ये भारतीय पुरुष संघ अंतिम राऊंड-रॉबिन सामन्यात चीनकडून पराभूत झाला आणि ''अ'' गटात दुसऱ्या स्थानी राहिला. चीनला पराभूत करण्याचे भारताचे प्रयत्न अपुरे पडले. लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग
लक्ष्य सेन


कोपनहेगन, 30 एप्रिल (हिं.स.)थॉमस कप २०२६ मध्ये भारतीय पुरुष संघ अंतिम राऊंड-रॉबिन सामन्यात चीनकडून पराभूत झाला आणि 'अ' गटात दुसऱ्या स्थानी राहिला. चीनला पराभूत करण्याचे भारताचे प्रयत्न अपुरे पडले. लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला अत्यंत निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला.आपल्या मागील गट सामन्यांमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारत आणि चीन या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. बुधवारचा सामना गट विजेता निश्चित करण्यासाठी होता, जो अखेरीस चीनने ३-२ ने जिंकला.

लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीतील सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीकडे सामना जिंकण्याची संधी होती. पण निर्णायक सामन्यात त्यांना अपयश आले. लक्ष्य माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगकडून १९-२१, २१-८, १२-२१ ने पराभूत झाला, तर सात्विक आणि चिराग या स्टार जोडीने लियांग वेई कांग आणि वांग चांग यांच्याविरुद्ध पाच मॅच पॉईंट वाचवूनही १३-२१, २१-१३, २४-२६ ने पराभव सहन केला. ०-२ ने पिछाडीवर असताना, आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता आयुष शेट्टीने भारताला पुन्हा गुणतालिकेत आणले. त्याने एक गेमने पिछाडीवर असताना जोरदार पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर असलेल्या वेंग हॉंग यांगला १७-२१, २१-१३, २१-१५ ने पराभूत करत गुणसंख्या १-२ अशी बरोबरीत आणली.

हरिहरन आमसाकरुणन आणि एम. आर. अर्जुन या दुसऱ्या पुरुष दुहेरी जोडीला आपली लय कायम राखता आली नाही आणि ते हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याकडून १७-२१, १३-२१ ने पराभूत झाले, ज्यामुळे गटात अव्वल येण्याच्या भारताच्या आशा संपुष्टात आल्या आणि भारत १-३ ने मागे पडला. एचएस प्रणॉयने लू ग्वांग झूवर २०-२२, २१-१९, २१-११ असा विजय मिळवून पिछाडी कमी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande