अकोला जिल्ह्यातील 45 हजार नोंदणीकृत दिव्यांग बांधवाच्या हितासाठी रणधीर सावरकर यांचा पुढाकार
अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)। दिव्यांग बांधवांच्या विविध योजना,शासनाने नवीनच सुरु केलेले दिव्यांग सहायक पोर्टल, UDID कार्ड आधार शी लिंक करणे, तथा दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध व्हावे या साठी लागणाऱ्या उपाय योजना भविष्यात येणाऱ्या अडचणी या सर्व
Photo


अकोला, 05 एप्रिल (हिं.स.)।

दिव्यांग बांधवांच्या विविध योजना,शासनाने नवीनच सुरु केलेले दिव्यांग सहायक पोर्टल, UDID कार्ड आधार शी लिंक करणे, तथा दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध व्हावे या साठी लागणाऱ्या उपाय योजना भविष्यात येणाऱ्या अडचणी या सर्व समावेशक दिव्यांग बांधवांच्या संबंधित बाबींचा पूर्णतःआढावा हा प्रत्येक विभागातील जिल्ह्या पातळीवरील मुख्यअधिकाऱ्यांकडून बैठकी दरम्यान घेतला. सदर बैठकी मधूनच दिव्यांग बांधवांना असलेल्या तांत्रिक अडचणी निर्माण होण्या अगोदरच पूर्व नियोजन करणे अत्यवाश्यक असल्याचे या बैठकी मध्ये सूचना आ. रणधीर सावरकर यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या. अकोला जिल्ह्यातील 45 हजार नोंदीत दिव्यांग बांधव असून त्यापैकी काही बोगस (खोटे )लाभार्थी असण्याची शंका असल्याचे अधिकारी यांनी स्पष्ट केले. सर्वात दुःखी असलेल्या खऱ्या दिव्यांग बांधवांचा हक्क बाधित होऊ नये यासाठी काळजी घ्यावी हि ताकीत व सूचना सर्व अधिकारी यांना यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या. दिव्यांग बांधवांची नोंदणी सेतू केंद्रामार्फत व्हावी, विविध मार्गदर्शन शिबीरांचे तथा मेळाव्यांचे चे प्रत्येक तालुका, ग्रामपंचायत स्थरावर आयोजन करण्यात यावेत जेणेकरून दिव्यांग बांधवांना दिलासा मिळेल.यावेळी दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे यांच्याशी फोन कॉल द्वारे दिव्यांग बांधवांच्या सेवेत अकोट दिव्यांग मंडळ तात्काळ सुरु करावे या बाबत चर्चा केली. त्यावर मंत्री महोदयांनी निश्चित लवकरच अकोट येथील सेंटर सुरु करण्यासाठी हिरवी झेंडी दिली.दिव्यांग बांधवांना मिळणारे संजय गांधी आर्थिक अनुदान हे ज्या दिव्यांगांनी आपले UDID कार्ड आधार शी लिंक केले, ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र कायम आहेत. त्यांना अनुदान सुरूच राहणार असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले परंतु ज्यांचे प्रमाणपत्र तात्पुरते आहेत अशा लाभार्थ्यांना आपली फेर तपासणी करून घ्यायची आहे.कुठलाही योग्य दिव्यांग बांधव लाभापासून वंचित राहू नये याबाबत सुद्धा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी अधिकारी यांना सूचना केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande