अकोला : वाहतूक नियम उल्लंघनावर विशेष नाकाबंदी; २ लाखांहून अधिक दंड आकारला
अकोला, 06 एप्रिल (हिं.स.) । पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष नाकाबंदी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांना वाहतूक सुरक्षा आणि नियमांचे
Photo


अकोला, 06 एप्रिल (हिं.स.) । पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष नाकाबंदी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांना वाहतूक सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे होता.

या नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.

मोहिमेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

एकूण नाकाबंदी पॉईंट: ३७

अधिकारी संख्या: ३०

अंमलदार संख्या: १३६

नंबर प्लेट नसलेली वाहने: १६

ट्रिपल सीट वाहन चालवणे: २५

मॉडिफाईड बुलेट सायलेंसर: १

ड्रं

क अँड ड्राईव्ह केसेस: ८

इतर वाहतूक नियमभंग: १५४

मोटार वाहन केसेस: २०४

आकारण्यात आलेला दंड: ₹१,०९,३००

तपासलेली वाहने: दुचाकी ७५८,

चारचाकी ४१०,

एकूण ११६८

खुल्या

जागेत मद्यप्राशन करणारे व्यक्ती: १३

कलम ११०, ११७ बीपी एक्ट प्रमाणे कारवाई: ४०

अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली असून पोलीस प्रशासन नागरिकांना सतत सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे व नंबर प्लेट योग्य स्थितीत ठेवावीत, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande