नेरळ पाडा रेल्वे गेटवर दिलासा; ८ एप्रिलपासून रात्री काम सुरू
रायगड, 06 एप्रिल (हिं.स.) : नेरळ पाडा रेल्वे गेटवरील कामामुळे मार्ग पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील पाठपुरावा आणि भगवान चंचे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनाने माघ
Relief-at-Neral-Pada-railway-g


रायगड, 06 एप्रिल (हिं.स.) : नेरळ पाडा रेल्वे गेटवरील कामामुळे मार्ग पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील पाठपुरावा आणि भगवान चंचे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रेल्वे प्रशासनाने माघार घेत पूर्णबंदीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यानुसार आता ८ एप्रिलपासून संबंधित काम रात्रीच्या वेळेत करण्यात येणार आहे. काम जलद गतीने पूर्ण व्हावे आणि नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, या कामादरम्यान काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

या मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी, दीर्घकाळ बंद राहण्याचा त्रास आणि प्रस्तावित पूर्णबंदीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. मात्र, भगवान चंचे व ग्रामसेवक अरुण कार्लेकर यांच्या पुढाकारामुळे रेल्वे प्रशासनाने निर्णयात बदल करत कामाचा मार्ग मोकळा केला आहे.

आता ८ एप्रिलपासून सुरू होणारे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असून प्रशासनानेही कामाचा वेग वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande